Welcome

Website counter
website hit counter
website hit counters

Wednesday, September 18, 2013

वामन मेश्राम, मुलनिवासी नायक आणि सांस्क्रुतीक दहशतवाद!

वामन मेश्राम, मुलनिवासी नायक आणि सांस्क्रुतीक दहशतवाद!

शाळकरी वयात मी फुले-आंबेडकरी चळवळीच्या सम्पर्कात आलोडा.बाबा आढाव यांचे महात्मा फुले समता प्रतिष्ठानराष्ट्रसेवा दल आदि संघटनांशी माझा संबंध आलाप्रागंबासरदारअनिल अवचट,डाकुमार सप्तर्षिनरहर कुरुंदकरनानासाहेब गोरेयदुनाथ थत्ते आदिंच्या भाषणांचा माझ्या कोवळ्या वयात ठसा उमटलाशाळेत असतांनाच विविध वाद-विवाद वर्क्तुत्व स्पर्धांच्या निमित्ताने वाचन होत होतेविशेषतपुणे विद्यार्थी ग्रुहाच्या महाराष्ट्र विद्यालयात असतांना तेथील शिक्षकांच्या संस्कारांतुन वाचन वाढत राहिलेशाळेच्या परंपरेनुसार ईयत्ता आठवी व नववीत असतांना मी लिहिलेल्या शोधपर प्रबंधांचे सर्वदुर 
कौतुक झालेत्यावेळी एका मोठ्या इतिहासकाराने शाळकरी वयातील विद्यार्थ्याला प्रोत्साहन देण्याच्या भावनेने असावे बहुदामाझ्या प्रबंधावर अभिप्राय लिहितांना (१९७८) "या मुलामद्धे राजवाडेकेतकर दडलेले आहेत." असे म्हटले होतेया आणि इतरांच्या प्रोत्साहनामुळे आपल्यावरील जोखीम वाढल्याची मला सतत जाणीव रहात आली आहे.मी एम-फिलकरत असतांना बाळ गांगल यांनी महात्मा फुले यांची बदनामी करणारे दोन लेख सोबत साप्ताहिकात लिहिलेत्यांना साधार आणि समर्पक उत्तरे देनारे लेख मी अनेक वर्तमानपत्रांतुन लिहिलेत्याचे पुस्तक करावे अशी सुचना पु.देशपांडे यांनी केलीहे पुस्तक पु..यांच्याच हस्ते प्रकाशित झालेत्याला अनेक पुरस्कार मिळालेया पुस्तकाने मी गंभीर संशोधनपर लेखनाकडे वळलोडादिफडके यांचा सहाय्यक म्हणुन मला महात्मा फुले समग्र वाड्मयाचे काम करता आलेमहाराष्ट्र सरकारने महात्मा फुले शताब्दि वर्षात त्यांच्या साहित्याचे प्रकाशन करण्यासाठी व त्याचा भारतीय भाषांमद्धे अनुवाद करण्यासाठी नेमलेल्या समितीवर माझी सचीव म्हणुन निवड झालीडा.बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्याचे काम आधिपासुन चालू होते.वसंत मून हे त्या समितीचे सचीव होतेते निव्रुत्त झाले होते.प्यरालिसिसने आजारी होतेत्या काळात मी त्यांचा सहाय्य्यक म्हणुन काम करीत होतोवसंत मून व यदिफडके यांचे आपापसात पटत नव्हतेत्या दोघांसोबत एकाच वेळीस काम करणे हे अत्यंत जिकिरीचे होतेतोल साधतांना फार तारांबळ उडत असेपुढे मून वारलेत्या समितीची जबाबदारी माझ्यावरच सोपवण्यात आलीमाझ्या कार्यकाळात मी डाबाबासाहेब आंबेडकर:लेखन आणि भाषणे (खंड १७ ते २२यांचे १० ग्रंथ मी प्रकाशित केलेया कामी मला तत्कालीन समिती सदस्यांचे सहकार्य लाभलेविशेषतडाकासारेगोडघाटे,कांबळे यांचा आवर्जुन उल्लेख केला पाहिजेमहात्मा फुले व राजर्षि शाहू ग्रंथसमितीचे कामही मी पहात होतोत्याचेही ग्रंथ मराठी-हिंदी-इंग्रजीत प्रकाशित करत होतोत्यामुळे १०० वर्षे फक्त मराठीतच राहिलेले फुले साहित्य प्रथमच मराठीच्या सीमा ओलांडुन हिंदी-इंग्रजीबंगाली,तेलगुकन्नडउर्दुसिंधीगुजराथीपंजाबी अशा भारतीय भाषांमद्धे पोहोचलेजाणत्यांनी ते डोक्यावर घेतलेया काळात मी भटक्या विमुक्तांच्या आणि आंबेडकरी चळवळीमद्धे सक्रिय होतोविद्यार्थी दशेत नामांतर आंदोलनात मी प्रदीर्घ कारावास भोगला होताअनेक सामाजिक संघटना मला व्याख्यानांसाठी बोलवत असतअसेच कधीतरी बामसेफने मला भाषणासाठी बोलविलेबामसेफचे नेते डीकेखापर्डे यांच्याशी परिचय झालामाझे लेखनसंशोधन आणि वक्त्रुत्व यांचे ते चाहते होतेत्यांच्या म्रुत्युनंतर बोरकर व मेश्राम यांच्याकडे संघटनेची सुत्रे आलीपाटण्याच्या राष्ट्रीय अधिवेशनानंतर वामन मेश्राम यांच्या कार्यपद्धती व चारित्र्याबाबत चौकशी समिती नेमुन त्यांना बामसेफमधुन काढुन टाकण्यात आलेमी या संघटनेचा सदस्य नसल्याने सर्वच गटांच्या कार्यक्रमांना जात असेगेली ९-१० वर्षे प्रामुख्याने मेश्राम गटाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय अधिवेशनांमद्धे दर वर्षी नवा विषय निवडुन मी प्रदिर्घ भाषणे दिली आहेतयातल्या एका भाषणाचे त्यांनी पुस्तकही प्रकाशित केले आहेत्याचा हिंदी अनुवादही प्रसिद्ध करण्यात आला आहे.माझ्या भाषणाच्या हजारो क्यसेटस विकल्या जाता असे मला सांगीतले जात असे२००५ साली बामसेफचे आंतरराष्ट्रीय अधिवेशन लंडन येथे झालेआंतरराश्ट्रीय संघटक मिल्कियत सिन्ग बहेल यांचा आग्रह होता म्हणुन मी त्या सम्मेलनाला गेलोश्री बहेल यांनी स्वत:च्या घरात माझी निवास व्यवस्था केलीमी या काळात इंडिया ओफिस लायब्ररी,ब्रिटिश मुझियम लायब्ररीसंसद भवन पुराभिलेखागार येथे संशोधन केलेविविध बुद्धविहारांमद्धे व विद्यापीठांमद्धे भाषणे दिलीहा दौरा सहलीसाठी नाही याची मनाशी खुणगाठ बांधून मी सर्व वेळ संशोधनात व्यतीत केलाया काळात कोणत्याही पर्यटन स्थळाला मी भेट दिली नाहीयाच काळात डासाळुंखे यांच्यामुळे मी मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यक्रमांना जावू लागलोबहुजनसमाजाव्हे प्रबोधन झाल्याशिवाय महाराष्ट्राचे ख-या अर्थाने प्रबोधन होणार नाही या भुमिकेतुन मी त्यांच्या कार्यक्रमांना हजेरी लावत असेविवेकी आणि तारतम्य बाळगणा-या अभ्यास पद्धतीचा वापर करून फुले-शाहु-आंबेडकर यांचे खरे विचार तरुणांपर्यंत पोहोचवण्याचा माखा प्रयत्न होता.या संघटनांच्या कार्यक्रमांना मी जाणे माझ्या अनेक मित्रांना तेंव्हाच मान्य नव्हतेआर.पी.आय च्या सर्व प्रमुख नेत्यांचा बामसेफ सोबत जाण्याला विरोध होतात्याची मला भरपुर किंमतही मोजावी लागली.तथापी जे आपल्या विवेक बुद्धीला पटते ते निरपेक्षपणे करत राहणे ही माझी जीवनव्रुत्ती आहेमी या उपरोक्त संघटनांकडुन प्रवासखर्चाव्यतिरिक्त एक दमडीही मानधन घेतलेले नाहीमाझ्या पुस्तकांचे व सी.डीं.चे स्वामित्वधनही मला कधी मिळालेले नाही.माझ्या चरितार्थासाठी मी या संघटनांवर कधीही अवलंबुन नव्हतोमी केलेल्या संशोधनाचा पुरेपूर वापर नेते आणि कार्यकर्ते करीत आहेत यातच मला आनंद होताअनेकदा माझेच संशोधन स्वता:च्या नावावर सांगण्याचा वा छापण्याचाही प्रयत्न नेतेमंडळींनी केला आहे.दर्म्यान भांडारकर प्रकरण घडलेजेम्स लेनने छत्रपती शिवराय व राष्ट्रमाता जिजावु यांची केलेली बदनामी आमच्या जिव्हारी लागली होती.भांडारकरमधील मंडळींनीच सदर माहिती लेनला दिल्याचे आम्हाला शपथेवर सांगण्यात आले होतेत्यामुळे भांडारकरबद्दल आम्हा तरुणांच्या मनात आकस होतामी या संदर्भात त्या काळात भाषणे दिली आहेतमाझ्या परवानगीशिवाय आणि मला कल्पनाही न देता ब्रिगेडने ती यु ट्युबवर टाकली आहेतचमी या काळात केलेले लेखन आपल्यासमोर आहेचअडिच वर्षांपुर्वी महाराष्ट्र सरकारने माझी व डा.साळुंखे यांची शासन नियुक्त सदस्य म्हणुन भांडारकरवर नियुक्ति केलीआम्ही तेथे गेल्यानंतर काही गोष्टींचा उलगडा झालाज्या १४ जणांचे लेनने आभार मानले आहेत त्यातील ६ जणांचा म्रुत्यु झालेला आहे.यातील अनेकांचा भांडारकर संस्थेशी कधीही संबंध आलेला नाहीज्यांचा उल्लेख ब्रिगेड व बामसेफ "१४ भटअश्या शब्दात करतात त्यातील अनेकजण जैनसी.के.पी., सारस्वत आहेत...होते.यच काळात ब्रिगेडने बहुजनसमाजातील ऐक्य मोडीत काढणारा मराठा आरक्षणाचा मुद्दा उकरून काढलाआम्ही सर्वजण दादोजी कोंडदेव व लेन प्रकरणात एकत्र असतांना या आंदोलनातुन मिळालेली शक्ती व प्रसिद्धी यांचा वापर करुन दुबळ्या व सत्ताविहिन भटक्या विमुक्तांना आणि कारु-नारुबलुतेदार-आलुतेदारांना मंडल आयोगामुळे मिळालेले हक्क अपहरण करुन सत्ताधारी जातीच्या खिशात घालण्याचा डाव खेळण्यात आलाज्यांनी विश्वासाने आपले सर्वस्व या चळवळीसाठी दिले त्यांचाच बळी घेण्याच्या या कटाला विरोध करणे हे आमचे सामाजिक दायित्व नव्हते कि कायबामसेफने खरे तर सर्वात आधी या कटाला विरोध करायला हवा होता...परंतू महाभारतात म्हटल्याप्रमाणे "अर्थस्य पुरुषो दास:" ही उक्ति खरी ठरलीब्रिगेडने मराठा आरक्षणासाठी मेश्राम गटाचा चतुराईने वापर करुन घेतलात्यांचे ठीक आहे...परंतु मेश्रामांचे हे वागने हे ओ.बी.सी.चा विश्वासघात करणारे नाही कायज्या मराठा आरक्षणाला सर्व वैधानिक आयोगांनी विरोध केला आहेउच्च व सर्वोच्च न्यायालयाने त्याच्या विरोधात निकाल दिलेले आहेत त्याची वकिली ही मंडळी करीत राहिलीत्यासाठी "वाजवा टाळी...हाकला माळी..", "वाजवा तुतारी...हाकला वंजारी...",atrocity चा bomb अशा घोषणा देवून दलित.बी.सीभटके-विमुक्त विरोधी राजकारण प्रच्छन्नपणे खेळले गेलेयाची धग लागणे अपरिहार्य होतेमहाराष्ट्राच्या राजकारणाची बदललेली गती आणि दिशा स्पष्ट दिसत असतांना सत्ताधा-यांच्या डावपेचाचा पट जनसामान्यांना उलगडवून दाखवणे आमचे कर्तव्य बनलेतसेच सामाजिक प्रबोधनासाठीअभ्याससंशोधन,विवेकी भुमिका ही पुर्वशर्त असते याचे भान मला होतेपण दुर्दैवाने अल्पशयशाने हुरळुन जावुन मेश्राम आणि खेडेकरांनी शिवराळ भाषा आणि बेफाम आरोपांचा जणु भडीमारच सुरु केलाआपण म्हणजेच फुले-आंबेडकरी चळवळ असे समीकरण आपल्या भक्तांकरवी राबवायला सुरुवात केलीनेत्यांचा इको बनुन सर्वांनी बोलले पाहिजे अशी दमबाजी सुरु झालीकोणीही स्वतंत्र मते मांडणे हा गुन्हा ठरु लागला.एकचालुकानुवर्तीत्वगोपनीय आर्थिक व्यवहारजातीची हिटलरशाही आणि ब्राह्मणद्वेषाची अनियंत्रित मांडणी याचा जाच असह्य होवू लागल्यामुळे या मंडळीपासुन दुर होणे अपरिहार्य बनलेडासाळुंखे व मी यांच्यामुळे या संघटनांना विश्वासार्हता व प्रतिष्ठा मिळत असल्याने या पुढे त्यांच्या पापाचा भागिदार आपण व्हायचे नाही असे मला ठरवावे लागलेभांडारकरमद्धे आमचे असणे गेली २ वर्षे ज्यांना खटकले नव्हते त्यांनी ६ महिन्यांपुर्वी अचानक जाहीर ठराव करुन भांडारकर सोडण्याचा आम्हाला आदेश दिलाभोळ्या-भाबड्या कार्यकर्त्यांना emotional blackmailing करण्यासाठी भांडारकरचे हत्यार पुढे करण्यात आलेज्या वैचारिक मतभेदांमुळे मी यांच्यापासुन दुर गेलो त्याकडे लोकांचे दुर्लक्ष व्हावे यासाठी भांडारकरची ढाल वापरली गेलीगेली सहा महिने त्यांच्या मुलनिवासी नायक या मुखपत्रातुन किमान १०० वेळा धादांत खोट्या हेडलाईन्सअग्रलेखबातम्या व लेखांचा माझ्याविरुद्ध भडिमार करण्यात आलाव्यक्तिगत चारित्र्यहणन आणि अपशब्दांचा मारा बघुन खरे तर कोणीही हबकुन जाईलमात्र ज्यांच्या सोबत मी ९-१० वर्षे रसद पुरवित मी काम केले ते सर्व ब्रिगेड व बामसेफचे कार्यकर्ते आपण अगतिक असल्याचे सांगत राहिलेया संघटनांमद्धे लोकशाहीचा लवलेशही नसल्यामुळे कोणीही ब्रही उच्चारणे शक्य नव्हतेया मंडळींना कधीतरी सद्बुद्धी सुचेल अशी अपेक्षा ठेवुन मी शांत राहिलोमी पाठवलेला एकही खुलासा त्यांनी छापला नाहीमुख्य प्रवाहातील माध्यमांकडे असनारे हे सौजन्य पाळणे म्हणजे बहुदा चळवळीविरुद्ध वागणे असावे असा तर त्यांचा समज नाही नामाझ्या संयमाला माझी अगतिकता मानुन नित्य नवे आरोप प्रत्यारोप चालुच ठेवण्यात आलेफुले आंबेडकरी चळवळीतील दिग्गजशरद पाटीलरावसाहेब कसबे,भालचंद्र मुणगेकरविलास वाघदत्ता भगतउत्तम कांबळेसुखदेव थोरातनरेंद्र जाधवनागनाथ कोत्तापल्ले आदिंवर अपशब्दांचा मारा करुन सातत्याने बदनामीपर मजकुर प्रकाशित केला जात होताच पण नंतर तो सारा रोख माझ्याकडे वळवण्यात आला. बहुदा त्यांचा अंतर्गत व्यवहार हरी नरकेंना माहित असल्याने त्यांनी तो उघड करु नये यासाठी "बदनाम करा, संशयास्पद बनवा आणि संपवा" ह्या नीतिचा वापर करण्यात आला. चवताळुन सारी यंत्रणा या कामाला लावण्यात आली. इतरांनी जणु हा आमचा अंतर्गत मामला आहे अशी समजुत करुन घेवुन सोयिस्कर मौन पाळले. शिविगाळीला पराक्रम समजणारी ही मंडळी विरोधाच्या नादात फुले-आंबेडकरी मुल्ल्ये बिनदिक्कतपणे पायदळी तुदवत सुटली. एकदा विवेक संपला कि फ्यासिझमचे बिभत्स रुप पुढे येणे अपरिहार्य असते. "वेश्या, भडवा, दलाल, बदमाश, हरामखोर" या शब्दांच्या आरत्या नित्यनेमाने ओवाळण्याचे कर्मकांड सुरु झाले. भक्तांकडुन शिवीगाळ आणि धमक्या यांचे सत्र सुरु करण्यात आले. "शत्रु तो शत्रुच आणि माजी-मित्रही शत्रुच" ही मोहीम हाती घेण्यात आली. 
महापुरुषांना वेठीला धरुन खोट्या बातम्या देण्यात आल्या. देवदेवतांचा वापर करुन दंगली घडवणारे आणि महापुरुषांच्या बदनामीची खोटी आवई उठवुन चिथावणी देणारे हे लोक ही जुळी भावंडेच म्हटली पाहिजेत. असे करतांना आपण किती गंभीर सामाजिक गुन्हा करत आहोत याचे भानही त्यांना राहिलेले नाही. सुनियोजित दंगली घडवून सरसकट सर्वच ब्राह्मणांच्या कत्तली करा असा आदेशच खेडेकर यांनी "शिवरायांच्या बदनामीची केंद्रे" या ग्रंथाच्या प्रुष्ठ क्रमांक ५४-५५ वर दिला आहे. खेडेकरांच्या जिजाई प्रकाशनाचे हे पुस्तक ७व्या मराठा साहित्य सम्मेलनात सांगली येथे १३ नोव्हेंबर २०१० रोजी प्रकाशित करण्यात आले आहे. (संदर्भासाठी पहा www.jijaiprakashan.comकिंमत रु.२५/-) खेडेकरांनी आपले दादोजी कोंडदेव हे पुस्तक चक्क जेम्स लेनला अर्पण केले आहे. त्यांच्या पत्नी श्रीमती रेखा खेडेकर या भारतीय जनता पक्षाच्या १५ वर्ष आमदार होत्या. भांडारकर संस्थेमद्धे नरके-साळुंखेंनी जाण्याला ज्यांचा विरोध आहे त्यांना यातले काहीच कसे खटकत नाही? तोंडाने सतत बहुजनवादाचा गजर करणा-या खेडेकरांनी शिवराय-दादोजी संबंधातील शासकीय समितीवर ७ मराठा व ५ ब्राह्मण सदस्य घ्यायला लावले. त्यात ब्रिगेडचे ५ जण होते. तक्रारदारांनाच न्यायाधिश बनवण्याची ही जगावेगळी पद्धत म्हटली पाहिजे. बौद्ध, ओ.बी.सी., दलित-आदिवासी, भटके-विमुक्त यातील एकही इतिहासकार...ज्यांना समितीसाठी योग्य वाटला नाही ते तोंडाने बहुजनवादाचा गजर करत असतात यासारखा विनोद तो कोणता?
वरील घटनाक्रम पहाता आजवर मुक साक्षीदार बनलेल्या जाणत्यांना मी हे सांगु इच्छितो कि मी आजवर आतला आवाज ऐकुन विवेकाने वागत आलो आहे. संशोधन, लेखन व भाषणे करतांना कधीही तारतम्य सोडलेले नाही. पुराव्यांच्या आधारे आणि सत्याच्या कसोटीवर घासुन पाहिल्यानंतर जे जे सिद्ध झाले ते ते जनसामान्यांपुढे मांडतांना मी निर्भयपणे कोणाच्याही रागालोभाची पर्वा केलेली नाही. त्याची किंमत मला मोजलीच पाहिजे, त्याबद्दल माझी तक्रारही नाही. अनेक मतभेद असुनही या संघटनांचे काम बहुजनहिताचे आहे असा माझा समज असल्याने माझे संशोधन आणि विचार मांडण्यासाठी मी त्यांसोबत होतो...पण माझ्याच विचार-संशोधनाचा गैरवापर बिनदिक्कतपने सुरु झाल्याने आणि माझ्या पुस्तकांचा व सी.डीं.चा या त्यांच्या बदकर्माच्या समर्थनार्थ वापर होवु लागल्याने मला त्यांच्यासोबत राहणे अशक्य झाले. आणि ज्याक्षणी मी त्यांची साथ सोडली त्याक्षणी त्यांनी माझ्यावर क्रुर हल्ले सुरु केले. 
सध्याची ही लढाई खरे तर अत्यंत विषम आहे. कोट्यावधी रुपये निधी मिळवणा-या बलाढ्य संघटना, त्यांचे पुर्नवेळ प्रचारक, भक्त, त्यांचे मुखपत्र विरुद्ध एक सामान्य अभ्यासक असा हा संघर्ष आहे. माझ्या सोबत फक्त सत्य आणि माझा विवेक आहे. 
---------प्रा. हरी नरके 

harinarke@gmail.com
harinarke@yahoo.co.in 

No comments:

मैं नास्तिक क्यों हूं# Necessity of Atheism#!Genetics Bharat Teertha

হে মোর চিত্ত, Prey for Humanity!

मनुस्मृति नस्ली राजकाज राजनीति में OBC Trump Card और जयभीम कामरेड

Gorkhaland again?আত্মঘাতী বাঙালি আবার বিভাজন বিপর্যয়ের মুখোমুখি!

हिंदुत्व की राजनीति का मुकाबला हिंदुत्व की राजनीति से नहीं किया जा सकता।

In conversation with Palash Biswas

Palash Biswas On Unique Identity No1.mpg

Save the Universities!

RSS might replace Gandhi with Ambedkar on currency notes!

जैसे जर्मनी में सिर्फ हिटलर को बोलने की आजादी थी,आज सिर्फ मंकी बातों की आजादी है।

#BEEFGATEঅন্ধকার বৃত্তান্তঃ হত্যার রাজনীতি

अलविदा पत्रकारिता,अब कोई प्रतिक्रिया नहीं! पलाश विश्वास

ভালোবাসার মুখ,প্রতিবাদের মুখ মন্দাক্রান্তার পাশে আছি,যে মেয়েটি আজও লিখতে পারছেঃ আমাক ধর্ষণ করবে?

Palash Biswas on BAMCEF UNIFICATION!

THE HIMALAYAN TALK: PALASH BISWAS ON NEPALI SENTIMENT, GORKHALAND, KUMAON AND GARHWAL ETC.and BAMCEF UNIFICATION! Published on Mar 19, 2013 The Himalayan Voice Cambridge, Massachusetts United States of America

BAMCEF UNIFICATION CONFERENCE 7

Published on 10 Mar 2013 ALL INDIA BAMCEF UNIFICATION CONFERENCE HELD AT Dr.B. R. AMBEDKAR BHAVAN,DADAR,MUMBAI ON 2ND AND 3RD MARCH 2013. Mr.PALASH BISWAS (JOURNALIST -KOLKATA) DELIVERING HER SPEECH. http://www.youtube.com/watch?v=oLL-n6MrcoM http://youtu.be/oLL-n6MrcoM

Imminent Massive earthquake in the Himalayas

Palash Biswas on Citizenship Amendment Act

Mr. PALASH BISWAS DELIVERING SPEECH AT BAMCEF PROGRAM AT NAGPUR ON 17 & 18 SEPTEMBER 2003 Sub:- CITIZENSHIP AMENDMENT ACT 2003 http://youtu.be/zGDfsLzxTXo

Tweet Please

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

THE HIMALAYAN TALK: PALASH BISWAS BLASTS INDIANS THAT CLAIM BUDDHA WAS BORN IN INDIA

THE HIMALAYAN TALK: INDIAN GOVERNMENT FOOD SECURITY PROGRAM RISKIER

http://youtu.be/NrcmNEjaN8c The government of India has announced food security program ahead of elections in 2014. We discussed the issue with Palash Biswas in Kolkata today. http://youtu.be/NrcmNEjaN8c Ahead of Elections, India's Cabinet Approves Food Security Program ______________________________________________________ By JIM YARDLEY http://india.blogs.nytimes.com/2013/07/04/indias-cabinet-passes-food-security-law/

THE HIMALAYAN TALK: PALASH BISWAS TALKS AGAINST CASTEIST HEGEMONY IN SOUTH ASIA

THE HIMALAYAN VOICE: PALASH BISWAS DISCUSSES RAM MANDIR

Published on 10 Apr 2013 Palash Biswas spoke to us from Kolkota and shared his views on Visho Hindu Parashid's programme from tomorrow ( April 11, 2013) to build Ram Mandir in disputed Ayodhya. http://www.youtube.com/watch?v=77cZuBunAGk

THE HIMALAYAN TALK: PALASH BISWAS LASHES OUT KATHMANDU INT'L 'MULVASI' CONFERENCE

अहिले भर्खर कोलकता भारतमा हामीले पलाश विश्वाससंग काठमाडौँमा आज भै रहेको अन्तर्राष्ट्रिय मूलवासी सम्मेलनको बारेमा कुराकानी गर्यौ । उहाले भन्नु भयो सो सम्मेलन 'नेपालको आदिवासी जनजातिहरुको आन्दोलनलाई कम्जोर बनाउने षडयन्त्र हो।' http://youtu.be/j8GXlmSBbbk

THE HIMALAYAN DISASTER: TRANSNATIONAL DISASTER MANAGEMENT MECHANISM A MUST

We talked with Palash Biswas, an editor for Indian Express in Kolkata today also. He urged that there must a transnational disaster management mechanism to avert such scale disaster in the Himalayas. http://youtu.be/7IzWUpRECJM

THE HIMALAYAN TALK: PALASH BISWAS CRITICAL OF BAMCEF LEADERSHIP

[Palash Biswas, one of the BAMCEF leaders and editors for Indian Express spoke to us from Kolkata today and criticized BAMCEF leadership in New Delhi, which according to him, is messing up with Nepalese indigenous peoples also. He also flayed MP Jay Narayan Prasad Nishad, who recently offered a Puja in his New Delhi home for Narendra Modi's victory in 2014.]

THE HIMALAYAN TALK: PALASH BISWAS CRITICIZES GOVT FOR WORLD`S BIGGEST BLACK OUT

THE HIMALAYAN TALK: PALASH BISWAS CRITICIZES GOVT FOR WORLD`S BIGGEST BLACK OUT

THE HIMALAYAN TALK: PALSH BISWAS FLAYS SOUTH ASIAN GOVERNM

Palash Biswas, lashed out those 1% people in the government in New Delhi for failure of delivery and creating hosts of problems everywhere in South Asia. http://youtu.be/lD2_V7CB2Is

THE HIMALAYAN TALK: PALASH BISWAS LASHES OUT KATHMANDU INT'L 'MULVASI' CONFERENCE

अहिले भर्खर कोलकता भारतमा हामीले पलाश विश्वाससंग काठमाडौँमा आज भै रहेको अन्तर्राष्ट्रिय मूलवासी सम्मेलनको बारेमा कुराकानी गर्यौ । उहाले भन्नु भयो सो सम्मेलन 'नेपालको आदिवासी जनजातिहरुको आन्दोलनलाई कम्जोर बनाउने षडयन्त्र हो।' http://youtu.be/j8GXlmSBbbk