राज ठाकरे यांच्यावरील वॉरंट रद्द
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/12502160.cms
राज ठाकरे यांच्यावरील वॉरंट रद्द
2 Apr 2012, 1202 hrs IST
|
|
मनसे अध्यक्ष राज ठाकरे कल्याण कोर्टत हजर. (फाईल फोटो) मटा ऑनलाइन वृत्त । कल्याण
चार वर्षापूर्वीच्या रेल्वे भरती परीक्षेसाठी आलेल्या परप्रांतीय उमेदवारांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मारहाणीप्रकरणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आज कल्याण रेल्वे कोर्टात हजर राहिल्याने त्यांच्यावरील वॉरंट रद्द झाला आहे. खटल्याच्या सुनावणीच्या वेळी गैरहजर राहाण्याची मुभा राज ठाकरे यांनी कोर्टाकडे मागितली आहे. ऑक्टोबर २००८मध्ये रेल्वे भरती परीक्षेसाठी आलेल्या परप्रांतीय उमेदवारांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात मारहाण केली होती. या मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करतानाच त्यांना चिथावणी दिल्याप्रकरणी राज ठाकरे यांनाही यात सहआरोपी करण्यात आले होते. सुमारे साडेतीन वर्षांनंतर कल्याण रेल्वे कोर्टात याप्रकरणी दोषारोपपत्र ( चार्जशीट) दाखल झाले असून त्याची प्रत घेण्यासाठी राज यांना नियमानुसार सोमवारी रेल्वे कोर्टात हजेरी लावावी लागणार होती. त्यानुसार राज ठाकरे सकाळी ११ वाजता रेल्वे कोर्टात हजर राहिले. त्यावेळी , पुढच्या सुनावणीत त्यांना हजर रहावे लागू नये ,यासाठी ' परमनंट एक्झेम्पशन ' चा अर्ज त्यांच्या वतीने कोर्टात सादर केला गेला. हा अर्ज मंजूर झाल्यास पुढील सुनावणीच्या वेळी राज यांचे वकील त्यांच्यावतीने उपस्थित राहतील , असे मनसेच्या विधी विभागाचे सरचिटणीस अॅड. सुहास तेलंग यांनी सांगितले. |
|
No comments:
Post a Comment