आंबेडकरवाद : जातीव्यवस्थाअंतक लोकशाही समाजवादी क्रांतीचे तत्वज्ञान
आंबेडकरवाद : जातीव्यवस्थाअंतक लोकशाही समाजवादी
क्रांतीचे तत्वज्ञान
कोणत्याही क्रांतीला यशस्वी होण्यासाठी स्वतचे तत्वज्ञान विकसित करावे लागते. यामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांतीला तत्वज्ञानाच्या जननीचे स्थान दिले आहे. ते म्हणतात, ` क्रांती ही तत्वज्ञानाची जननी आहे. आणि जर ती तत्वज्ञानाची जननी नसेल तर ती तत्वज्ञानाला प्रकाशमान करणारा दीप आहे.' (लेखन व भाषण खंड -3 पृष्ठ 8) या पार्श्वभूमीवर भारतामध्ये संविधानाने अपेक्षित केलेल्या जातीव्यवस्थाविरोधी लोकशाही क्रांतीचे तत्वज्ञान कोणते आहे आणि ही क्रांती पुर्णत्वास नेण्यासाठी या तत्वज्ञानात आणखी कोणती भर घालणे आवश्यक आहे याचा विचार करणे आवश्यक आहे. भारतातील जातीव्यवस्थाविरोधी लोकशाही क्रांतीचे संकल्पन करणारा दस्तावेज म्हणजे भारतीय संविधान होय. भारतीय संविधानाच्या लेखन प्रकल्पाचे वैचारिक आणि व्यावहारिक नेतृत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले असल्यामुळे जातीव्यवस्थाविरोधी लोकशाही क्रांतीचा मुलाधार आंबेडकरवादी तत्वज्ञान असणे क्रमप्राप्त आहे. मात्र आंबेडकरवाद हे तत्वज्ञानच नाही असा अपप्रचार भारतातील सांस्कृतिक राष्ट्रवादी (वेदान्ती), भांडवलदारी राष्ट्रवादी, पोथीनिष्ठ मार्क्सवादी तसेच मार्क्स-लेनिन-माओवादी कम्युनिस्ट इत्यादी सर्व प्रवाह करीत आहेत. यांच्या जोडीला आता सर्वहारा कुलोत्पन्न अनौरस मार्क्सवाद्यांची भर पडली आहे. या पार्श्वभूमीवर जातीव्यवस्थाअंतक समाजवादी लोकशाही क्रांतीचे अधिष्ठात्रे तत्वज्ञान आंबेडकरवादच होऊ शकते हे प्रस्थापित करणे गरजेचे झाले आहे. जातीव्यवस्थेचा अंत केल्याशिवाय भारत हे राष्ट्र बनू शकत नाही हे सर्वप्रथम क्रांतीबा जोतिराव फुले यांनी जगाला ओरडून सांगितले. त्यांचे सर्वोत्तम वारसदार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतात कोणतीही क्रांती जातीव्यवस्थेचा अंत केल्याशिवाय होऊ शकत नाही हे शास्त्रशुद्ध पुराव्यानिशी सिद्ध केले. फुले-आंबेडकरांच्या या प्रमेयाला वेदान्ती तत्वज्ञानाच्या समर्थक स्वातंत्र्य चळवळीच्या नेत्यांनी तसेच भारतीय ब्रह्मो कम्युनिस्टांनी सातत्याने विरोध केला. मात्र आता आंबेडकरवाद हळूहळू भारतातील क्रांतीसैनिक असलेल्या दलित-आदिवासी आणि शुद्र जातीय जनतेच्या मनाची पकड घेतो आहे हे पाहून जातीच्या प्रश्नावर विचार करायला मार्क्सवाद्यांनी सुरूवात केली आहे. हे करताना त्यांच्याकडून भारतीय वास्तवाची यथार्थ चिकित्सा होईल असे अपेक्षित होते. मात्र भारतातील कम्युनिस्टांची जाणीव जरी मार्क्सवादी असली तरी नेणीव मात्र अजूनही वेदान्ती आहे हेच त्यांच्या जातीप्रश्नावरील भूमीकेतून स्पष्ट झाले आहे.
मार्क्सवाद्यांच्या एका गटाने चंदीगड येथे ''जाती प्रश्न व मार्क्सवाद''या विषयावर मार्च महिन्यात आयोजित केलेल्या परिसंवादासाठी आधारभूत मुद्याविषयी जे दृष्टीकोन पत्र सादर केले त्यात जातीव्यवस्था अंताच्या संदर्भात मार्क्सवादाला न मानणाऱया विचारवंतानी केलेल्या प्रयत्नांचा अधिक्षेप करण्यात आला. या दृष्टीकोनपत्रात जातिव्यवस्थेचा उगम,विकास,दृढीकरण याविषयी पारंपारिक मार्क्सवादी मते उद्धृत करून जातिव्यवस्थेच्या बळकटीकरणास जैन आणि प्रामुख्याने बौद्ध धर्मास जबाबदार धरण्यात आले आहे. या परिचर्चेत दलितांचा दृष्टीकोन मांडण्यासाठी आयोजकांनी दलित कुलोत्पन्न बालकम्युनिस्ट डॉ.आनंद तेलतुंबडे (ते वयाच्या 7 व्या वर्षी कम्युनिष्ट झाले असा त्यांचा दावा आहे) यांना आमंत्रित केले होते. डॉ. तेलतुंबडे यांनीही या परिसंवादात आंबेडकरवादाचा तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या एकंदरीत कार्यपद्धतीचा अधिक्षेप करणारी वक्तव्ये केली. याबाबतचे वृत्त दैनिक जनतेचा महानायकमध्ये पसिद्ध केल्यानंतर आंबेडकरवादी विचारवंतानी डॉ. तेलतुंबडे यांचा जोरदार प्रतिवाद केला. यामुळे गांगरलेल्या तेलतुंबडेनी आपली बाजू सावरण्यासाठी 'स्व-स्तुतीमग्न मार्क्सवादी आणि छद्म आंबेडकरवादी यांच्यासाठी (To Self Obsessed Marxist and Pseudo Ambedkarites) या नावाचा लेख पसिध्द केला आहे.( Sanhati.com/ articles/ 6366) या लेखात त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सपशेल अयशस्वी (Grand Failure) जीवनाचा पाढा वाचला आहे. त्याहीपुढे जाऊन डॉ. आंबेडकरांचे विचार उज्वल भविष्यासाठी अजिबात मार्गदर्शक होउढ शकत नाही हे ठासून सांगितले आहे. डॉ. तेलतुंबडे यांच्या म्हणण्यापमाणे डॉ.आंबेडकरांनी पहिल्यांदा हिंदु धर्माच्या व्यवस्थेत राहूनच काही सुधारणा करण्याचे आणि त्याद्वारे अस्पृश्यांच्या दुःखांची तीव्रता कमी करण्याचे प्रयत्न केले. महाडच्या सत्याग्रहाच्या मुद्यांवर सवर्ण समाजाकडून अपेक्षित प्रतिसाद न लाभल्यामुळे पुढे त्यांनी जातीच्या आधारावर राजकीय संधी मिळविण्याचा प्रयत्न केला. यासाठी स्वतंत्र मतदार संघाची मागणी लावून धरली. इंग्रजांनी ती मान्यही केली. परंतु गांधींच्या विरोधामुळे पुणे कराराद्वारे त्यांना या मागणीशी तडजोड करावी लागली. राजकीय आरक्षणामुळे दलितांचे हित साध्य होत नाही हे दिसून आल्यानंतर त्यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. कम्युनिस्टांशी हातमिळवणी करुन काही साध्य करता येईल काय याचाही प्रयत्न त्यांनी केला. परंतु तेथेही त्यांना कम्युनिस्टातील ब्राम्हणवादाचा अनुभव आला. इंग्रजांच्या जातीय राजकारणामुळे स्वतंत्र मजूर पक्षाचा प्रयोग फसला. त्यामुळे त्यांनी शेड्युल्ड कॉस्ट फेडरेशन ची स्थापना केली. या सुमारास ते व्हॉईसरायच्या कौन्सिलमध्ये मंत्री म्हणून दाखल झाले. इंग्रजांनी कमकुवत वर्गांना दिलेल्या प्राधान्यात्मक व्यवस्थेत काही बदल करुन आरक्षणाचा कोटा निर्माण करणे व काही कामगार कायदे मंजूर करुन घेणे एवढे काम ते येथे करु शकले. पुढे व्हॉईसराय कौन्सिल बरखास्त झाल्यानंतर ते सत्ता हस्तांतरणाच्या राजकारणातून तब्बल तीन वर्षे बाहेर फेकले गेले. स्वातंत्र्य प्राप्तीच्या कालावधीत तयार करण्यात आलेल्या हंगामी सरकारमध्ये त्यांना मंत्री बनता आले यासाठी गांधींच्या धोरणाला धन्यवाद दिले पाहिजेत. या काळात स्थापन करण्यात येत असलेल्या घटना समितीला सादर करण्यासाठी त्यांनी 'राज्य समाजवादाचा' मसुदा तयार केला. अनेक प्रकारच्या प्रतिकुल स्थितीतही त्यांनी घटनासमितीचे सदस्य म्हणून पूर्व बंगालमधून निवडून येण्यात यश मिळविले. परंतु ते निवडून आलेला प्रांत पाकिस्तानात समाविष्ट झाल्यामुळे त्यांचेही सदस्यत्व संपुष्ठात आले. या स्थितीत गांधींच्या पुढाकाराने काँग्रेसने त्यांना घटनासमितीचे सदस्य म्हणून निवडून आणले एवढेच नव्हेतर महत्वपूर्ण अशा मसुदा समितीचे अध्यक्षही बनविले. सुरुवातीला त्यांनी भारतीय संविधानाप्रती आदर दाखविला. परंतु लवकरच त्यांचा भ्रमनिरास झाल्यामुळे त्यांनी संविधानाला अमान्यही केले. आयुष्याच्या शेवटी त्यांनी 1935 मध्ये घेतलेल्या प्रतिज्ञेची पूर्तता म्हणून मूलतत्ववादी बौध्द धर्माची दीक्षा घेतली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनकमाचा ढोबळ मानाने आढावा घेतल्यास केवळ दलितमुक्तीचे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेऊन त्यांनी प्रत्येकवेळी आपले धोरण आणि डावपेच परिस्थितीनुसार बदलले आहेत. हे पाहाता त्यांनी प्रॉग्मॅटिझम व्यतिरिक्त अन्य कोणत्याही एका सिध्दांताचे किंवा सैध्दांतिक गृहितकाचे प्रतिनिधीत्व केल्याचे दिसत नाही. त्यांची सचोटी, कठोर परिश्रम, बौध्दीक प्रामाणिकता, निर्विवाद निष्ठा या सर्व गोष्टीसाठी ते एक आदर्श, एक रोल मॉडल म्हणून मान्य केले जाऊ शकतात. परंतु त्यांच्या नेहमीच्या धरसोडपणामुळे ते भविष्याचे मार्गदर्शक म्हणून स्विकारता येऊ शकत नाही. असे डॉ. तेलतुंबडे यांचे डॉ.आंबेडकरांच्या बाबतीतील विश्लेषण आहे. डॉ. आंबेडकरांच्या सपशेल अयशस्वी (Grand Failure )होण्याचे कारण त्यांनी जॉन ड्युई च्या विकसनशील कार्यवाद (Progressive Pragmatism ) चे अनुकरण करणे होय अशी मल्लीनाथीही त्यांनी केली आहे.
डॉ.आनंद तेलतुंबडे यांनी आंबेडकरवाद नावाचे कोणतेही तत्वज्ञान असू शकत नाही असा भ्रम निर्माण करुन जातीव्यवस्थेच्या विरुध्द उभ्या झालेल्या संघर्षाचा वैचारिक आधार उध्वस्त करण्याचा प्रयत्न केला आहे. हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी आंबेडकरवाद हे स्वतंत्र तत्वज्ञान कसे आहे याची मांडणी दैनिक जनतेचा महानायकच्या दि.7 एप्रिल 2013 च्या अंकात करण्यात आली आहे. डॉ. तेलतुंबडे यांनी डॉ. आंबेडकरांचे दलितांच्या मुक्तीचे केलेले सर्व प्रयोग पूर्णत असफल झाले.त्याच्याकडून भविष्याला मार्गदर्शक असा कोणताही दृष्टीकोन,विचार प्राप्त होऊ शकत नाही असा मुद्दा उपस्थित करून डॉ.आंबेडकरांनी पुनर्रचित (refine)करून स्वीकारलेले बुद्धाचे अनित्यात्मक बाह्यार्थवादी (Dialectical Realism) तत्वज्ञान व लोकशाही समाजवादी तत्वज्ञान यांच्या संयोगातून उभारलेले लोकशाही समाजवादी अनित्यात्मक बाह्यार्थवादी तत्वज्ञान खारीज केले आहे.याद्वारे त्यांनी जाती व्यवस्थेविरुध्दच्या संघर्षाला जीवंत ठेवणाऱया कार्यकर्त्यांचे मनोधैर्य खच्ची करण्याचा प्रयत्न केला आहे. या पार्श्वभूमीवर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपले तत्वज्ञान कोणत्या आधाराने विकसित केले आणि ते जातीव्यवस्था नष्ट करून भारतात जातीव्यवस्थाअंतक लोकशाही समाजवादी क्रांती करण्यास कितपत उपयुक्त आहे याची चिकित्सा करणे आवश्यक आहे.
कोणतेही नवे तत्वज्ञान आकाशातून पडत नसते तर अशा तत्वज्ञानाच्या निर्मितीपूर्वीच्या काळापर्यंत झालेला वैचारिक विकास आणि उपलब्ध वैज्ञानिक,तांत्रिक ज्ञान याचा वापर करून समस्या सोडविण्याच्या प्रयत्नातून विकास पावत असते. समाजकांतीचा पश्न जेव्हा निकरावर येतो आणि उपलब्ध ज्ञान-विज्ञान तसेच विचारपद्धती संघर्षाची केंडी फोडण्यास असमर्थ ठरते त्यावेळी नवा विचारव्यूह निर्माण होतो. या विचारव्यूहाला लोकमान्यता लाभते आणि समाजकांती पुढे सरकते असे इतिहासात अनेकदा सिद्ध झाले आहे. समाजकांतीचे तत्वज्ञान निर्माण करणाऱया पत्येक महापुरूषांनी त्यांच्या पूर्वसूरीने केलेल्या पयत्नांचा आढावा घेऊन त्यात आपल्या विचाराची भर घातली आहे. बुद्धाने वेदान्ती सांख्य तत्वज्ञानातील पुरूष आणि पकृतीचे द्वैत (Dialectic) व लोकायतांच्या भौतिकवादातील बाह्यार्थ (Reality) आणि आयुर्वेदातील `कारणामुळे परिणाम' हे तत्व या तिघांचा संयोग करून आपले पतित्य समुत्पादी अनित्यात्मक बाह्यार्थवादी तत्वज्ञान निर्माण केले. कार्ल मार्क्स यांनी सुद्धा हेगेलचे डायलेक्टीक आयडीएलीझम, लुडविग फायरबॉख यांचा यांत्रिक भौतिकवाद, फ्रेंच फिजिओकटीक अर्थशास्त्रज्ञ फ्रांकोइस क्यूझेमी व ब्रिटिश अभिजात अर्थशास्त्रज्ञ ऍडम स्मिथ यांचे भांडवलदारी राजकीय अर्थशास्त्र यांच्या संयोगातून आपले विरोधविकासी ऐतिहासिक भौतिकवादी तत्वज्ञान विकसित केले आहे. या पार्श्वभूमीवर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या तत्वज्ञानाची उभारणी करताना जॉन ड्युई यांच्या पोग्रेसिव्ह पग्मॅटिझमचा बुद्धाच्या अनित्यात्मक बाह्यार्थवादी तत्वज्ञानाशी संयोग करून आपले नवे तत्वज्ञान विकसित केले असेल तर ते तत्वज्ञानच नव्हे आणि असलेच तर ते भविष्याला मार्गदर्शक ठरू शकत नाही असे म्हणणे म्हणजे समाजकांतीच्या मार्गदर्शक तत्वाविषयी उपेक्षा दाखविणे होय.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी 3 ऑक्टोबर 1954 रोजी आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरुन केलेल्या भाषणात आपल्या जीवनाचे तात्वीक अधिष्ठान राजकारणात नसून धर्मात आहे हे स्पष्टपणे सांगितले आहे. ते म्हणतात, "My social philosophy, may be solely be enshrined in three words: Liberty, Equality and Fraternity. Let no one ever say that I have borrowed my Philosophy from the French Revolution. I have not ! My Philosophy has roots from the teachings of my Master, The Buddha. आपल्या तत्वज्ञानाचा मूळ स्त्राsत बुध्द आहे असे स्पष्ट नमूद केल्यानंतरही डॉ.आनंद तेलतुंबडे डॉ.आंबेडकरांच्या वैचारिकतेचा एकमेव स्त्राsत जॉन ड्युई आहे असे सांगण्यामागचा उद्देशच बुध्दाच्या तत्वज्ञानाला नाकारणे याशिवाय अन्य कोणताही दिसत नाही. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संपूर्ण लिखाणात जॉन ड्युई यांचे अनेक संदर्भ आलेले आहेत. मात्र त्यांनी आपले सामाजिक अथवा राजकीय तत्वज्ञान जॉन ड्युईच्या प्रोग्रेसिव्ह प्रॅग्मेटिझम वर अधिष्ठित असल्याचे नमूद केलेले नाही. जातिव्यवस्थेच्या रोगाचे निदान व या रोगाचे निर्मुलन करण्याच्या उद्दिष्टांचा जाहीरनामा समजल्या गेलेल्या Annihilation of Caste या आपल्या अत्यंत प्रसिद्ध भाषणात त्यांनी म्हटले आहे की "माझ्यावर ज्यांचे अत्यंत ऋण आहेत असे माझे शिक्षक प्रो.जॉन ड्युई यांनी माझ्या शिक्षणामध्ये मोलाचे मार्गदर्शन केले आहे." यामध्ये त्यांनी आपली तत्वज्ञानात्मक बैठक जॉन ड्युई च्या तत्वज्ञानावर आधारित आहे असे नमूद केलेले नाही. त्यांचे स्वीय सचिव नानकचंद रत्तू यांनी लिहिलेल्या त्यांच्या आठवणीत बाबासाहेबांनी जून 1952 मध्ये माईसाहेबांना लिहिलेल्या पत्रात "मी माझ्या संपूर्ण वैचारिक जीवनासाठी जॉन ड्युई यांचा ऋणी आहे" (I owe my whole intellectual life to Prof.John Dewey ) असे लिहिल्याचे नमूद केले आहे. याचा अर्थ डॉ. आंबेडकरांच्या विचारांचा एकमेव स्त्राsत केवळ जॉन ड्युईच आहेत असा होत नाही. तरीही तेलतुंबडे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या वैचारिकतेचा स्त्राsत जॉन ड्युई यांच्या विकसनशील कार्यवाद (Progressive Pragmatism ) या तत्वज्ञानातच आहे असा अध्यारोप करतात, यामागे डॉ. आंबेडकरांनी मार्क्सवादी तत्वज्ञानाला नाकारून भारतातील लोकशाही समाजवादी क्रांतीचे तत्वज्ञान म्हणून बुध्दाच्या तत्वज्ञानाला पुढे केले हे आहे. मार्क्सचे विरोधविकासी भौतिकवादी तत्वज्ञान भारतीय लोकशाही समाजवादी क्रांतीसाठी अपुरे आहे हे एव्हाना सिद्ध झाले आहे. मात्र वयाच्या सातव्या वर्षी मार्क्सवादाची दीक्षा घेतलेले डॉ.तेलतुंबडे आपल्या आवडत्या तत्वज्ञानाचा अपुरेपणा मान्य करायला तयार नाहीत यावरून ते किती पोथीनिष्ठ आहेत हे सिद्ध होते.
जॉन ड्युईचे तत्वज्ञान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वैचारिकतेचा एकमेव स्त्राsत आहे असे म्हणणे सर्वस्वी अयोग्य आहे. मात्र बुध्दाच्या अनित्यात्मक बाह्यार्थवादी (Dialectical Realism) तत्वज्ञानात राज्य समाजवादाची (State Socialism) जी भर घातली आहे त्यावर जॉन ड्युई च्या लोकशाही साधनवाद (Democratic Instrumentalism) या संकल्पनेची छाया असल्याचे म्हणता येईल. याशिवाय कायद्याने कागदोपत्री प्रस्थापित केलेली मुल्ये प्रत्यक्ष जीवनात लागू करण्यासाठी समाजाने संघटीत होऊन आपल्या शक्तीचा वापर केला पाहिजे हे संघर्षाचे सूत्र डॉ.आंबेडकरांनी ड्युईच्या विचारातून घेतले आहे. ड्युई म्हणतात ''organized Society must use its collective Powers to establish Conditions under which the mass of individuals can posses actual rights and liberty distinct from mere legal rights and liberty . (Liberalism and Social Action ,Page 21) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची वैचारिक जडणघडण अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात 1913 ते 1916 या कालावधीत शिक्षण घेत असतांना झाली. या विद्यापिठातील प्राध्यापकांपैकी डॉ. एडवीन आर सेलिग्मन यांच्या अर्थशास्त्राrय तत्वज्ञानाचा, डॉ. जॉन ड्युई यांच्या शैक्षणिक विचारांचा आणि डॉ. अलेक्झांडर गोल्डनवाईजर यांच्या समाजशास्त्राrय विचारांचा डॉ. आंबेडकरांच्या वैचारिकतेवर प्रभाव पडल्याचे त्यांच्या लिखानावरुन जाणवते. हे विचारवंत उदारमतवादी (Liberal) लोकशाहीचे पुरस्कर्ते होते. त्यांच्या लिखाणात अनेक भौतिकवादी आणि लोकशाहीवादी पाश्चात्य तत्वज्ञान्याचे प्रचूर संदर्भ सापडतात. 17 सप्टेंबर 1943 रोजी दिल्ली येथे `ऑल इंडिया ट्रेड युनियन वकर्स स्टडी कॅम्प'च्या समारोप पसंगी दिलेल्या भाषणात ते म्हणतात, श्रमिक वर्गातील पत्येकाला रूसोचा `सामाजिक करार' मार्क्सचा `कम्युनिस्ट जाहीरनामा', पोप लिओ तेरावे यांचे `इन्साईक्लिकल कम ऑन दि कन्डीशन ऑफ लेबर' आणि जॉन स्टुअर्ट मिलचे `ऑन लिबर्टी' ही पुस्तके वाचलीच पाहिजेत. मात्र डॉ.आंबेडकरांनी या विचारवंताना आपले तत्वज्ञानात्मक गुरुपद बहाल केलेले नाही हे त्यांच्या 3 ऑक्टोबर 1954 रोजी आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरुन केलेल्या भाषणाद्वारे स्पष्ट होते. त्यांच्या सामाजिक व आर्थिक इतिहासाच्या विश्लेषण पद्धतीचा तत्वज्ञानात्मक आधार पाश्चात्य भौतिकवादी, उदारमतवादी लोकशाहीवादी विचारवंतांच्या तत्वज्ञानात आहे. मात्र ही तत्वज्ञाने त्यांनी भारतातील जातीव्यवस्थाविरोधक लोकशाही समाजवादी क्रांतीसाठी जशीच्या तशी वापरलेली नाहीत.त्यांच्या सामाजिक परिवर्तनाच्या विचाराचा तत्वज्ञानात्मक आधार बुद्ध आणि कबीरांच्या तत्वज्ञानात आहे, तर कार्यात्मक आधार जोतीराव फुलेंच्या सत्यशोधक चळवळीत आहे.भारतातील धर्माधिष्ठीत जातीय अर्थव्यवस्था आणि धर्मप्रवण व्यक्तिमानस विचारात घेऊन त्यांनी नवे भारतीय क्रांतीशास्त्र विकसित केले. हे नवे क्रांतीशास्त्र म्हणजेच आंबेडकरवाद होय. या कांतीशास्त्राद्वारे म्हणजेच आंबेडकरवादी तत्वज्ञानाच्याद्वारेच भारतात जातीव्यवस्थाअंतक लोकशाही समाजवादी क्रांती घडून येईल.
No comments:
Post a Comment