बंद भारतात संमिश्र, मुंबई सुरळीत
वाढत्या महागाईच्या प्रमाणात पगारामध्येही वाढ व्हावी , कंत्राटी कामगारांनाही किमान वेतन ठरवून द्यावे ,खासगीकरणाचा सपाटा बंद करावा आदी मागण्यांसाठी देशातील कामगार संघटनांनी पुकारलेला दोनदिवसांच्या देशव्यापी संप सुरू झाला आहे . उत्तर भारतातील तसेच काँग्रेसेतर सरकारांच्या राज्यांमध्ये यासंपाला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे . मुंबईत मात्र , महत्त्वाच्या संघटनांनी अंग काढून घेतल्याने अपवादवगळता सर्व वाहतूक व व्यवहार सुरळीत सुरू आहेत .
भारतीय मजदूर संघ , इंटक , आयटक , सिटू , एआयसीसीटीयू , गोदी कामगार संघटना , भारतीय कामगारसेना महासंघ , औद्योगिक कामगार , वीज कामगार , परिवहन कामगार , बँक - विमा कर्मचारी संघटना ,केंद्र व राज्य सरकारी कर्मचारी संघटना संपात सहभागी झाल्या आहेत . त्यामुळे उत्तर भारतात संपाचा प्रभावकाहीसा जाणवत आहे . डाव्यांची ताकद असलेल्या केरळ व पश्चिम बंगालमध्ये तसेच बिहारमध्येही संप रेल्वे व रस्ते वाहतुकीवर संपाचा परिणाम झाला आहे.
मुंबईत मात्र दैनंदिन सेवांशी संबंधित असलेल्या बेस्ट , महापालिका , रिक्षा व टॅक्सी संघटनांनी संपातूनमाघार घेतल्यामुळे संप निष्प्रभ ठरला आहे . बहुतांश रिक्षा , टॅक्सी नेहमीप्रमाणे रस्त्यावर धावत आहेत .तर शिक्षक भारती , महाराष्ट्र राज्य ज्युनिअर कॉलेज संघटना , शिक्षक परिषद आणि संस्थाचालकसंघटनांनीही संपातून अंग काढून घेतल्याने शाळा , कॉलेजही सुरळीत सुरू आहेत .
शिवसेनाप्रणीत युनियनच्या रिक्षा , टॅक्सीचालक व बेस्ट कामगार सेना संपात उतरले असले तरी त्यांचीताकद अगदीच मर्यादित असल्याने वाहतुकीवर परिणाम झालेला दिसत नाही . शिवसेनेची युनियनअसलेल्या छोट्या - मोठ्या कंपन्या , हॉटेल्स व विमानतळावरील कंपन्यांवरच संपाचा थोडाफार परिणामझाल्याचे दिसत आहे .
लोकल ट्रॅकवर
लोकल सेवा ठप्प करण्याची क्षमता असणाऱ्या रेल्वे संघटनांनीही मवाळ भूमिका घेतल्याने पश्चिम , मध्यआणि हार्बर मार्गावरील लोकल सुरळीत सुरू आहेत .
एटीएमपुढे रांगा
देशातील सार्वजनिक , खासगी , विदेशी , सहकारी बँकांच्या ९० हजार शाखांमध्ये काम करणारे १० लाखकर्मचारी संपात सहभागी झाल्याने अपेक्षेप्रमाणे बँकांमध्ये शुकशुकाट आहे . त्यामुळे पैसे काढण्यासाठीशहरातील एटीएमच्या बाहेर रांगा लागल्या आहेत .
हरयाणात हिंसक वळण , कामगार नेत्याचा मृत्यू
देशव्यापी संपात सहभागी झालेल्या हरयाणा रोडवेज वर्कर्स युनियनच्या एका नेत्याचा आज अंबाला येथेमृत्यू झाला . अंबाल डेपोतून बाहेर पडणाऱ्या बस रोखण्याच्या प्रयत्नात बसची धडक लागून तो जागीच ठारझाला . या घटनेनंतर संतप्त झालेल्या कामगारांनी प्रशासनावर हत्येचा आरोप करत पोलिसांच्या गाड्यांचीतोडफोड केली . हरयाणा रोडवेजच्या महाव्यवस्थापकाविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदवला जावा , अशी मागणीकामगारांनी केली आहे . तोपर्यंत मृतदेहाला कोणी हात लावणार नाही , असा इशारा कामगारांनी दिला आहे .

No comments:
Post a Comment